Yash Interview : ‘पंख्याला उलट टांगल आणि पंखा सुरू केला’; यशने सांगितली बालपणीची थरारक आठवण
Yash Interview : या मुलाखतीत त्याने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत अनेक रंजक किस्से सांगितले. यातील एक किस्सा सर्वाधिक चर्चिला जात आहे.

Yash Interview : सध्या रॅाकिंगस्टार यश त्याच्या बहुचर्चित ‘टॅाक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन तो करत असून नुकतीच त्याने एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत अनेक रंजक किस्से सांगितले. यातील एक किस्सा सर्वाधिक चर्चिला जात आहे.
यश लहान असताना त्याच्या वडिलांनी त्याला पंख्याला उलट टांगल होतं आणि पंखा सुरू केला होता, अशी एक चर्चा आहे. याविषयी त्याने पहिल्यांदाच या मुलखतीत भाष्य करत नेमकं काय घडलं होतं याविषयी सांगितले.
यश लहानपणी खूप हट्टी आणि खोडकर होता, ज्यामुळे त्याला वडिलांकडून वारंवार ओरडा खावा लागत असे. आपल्या बालपणीचा एक भयानक प्रसंग सांगताना तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी मला पंख्याला उलटे टांगून तो चालू केला होता. ते मला नेहमी मारायचे. मी खूप खोडकर, उपद्रवी आणि हट्टी होतो. माझे वडील मला शाळेत असताना आणि कॉलेजला गेल्यावरही मारायचे, आणि कॉलेजच्या आतही मारायचे.”
मी बेशुद्ध झाल्याचे नाटक करून खाली पडलो
यशच्या वडिलांची भीती फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित नव्हती; त्याचे वर्गमित्र आणि मित्रदेखील त्यांना घाबरत होते. यश पुढे म्हणाला, “माझे मित्र माझ्या वडिलांना ‘टायगर’ म्हणायचे आणि ते त्यांना घाबरत होते. यश म्हणाला “त्यांनी मला कॉलेजमध्ये मारायला सुरुवात केली, तेव्हा मी बेशुद्ध झाल्याचे नाटक करून खाली पडलो. त्यानंतर त्यांनी मला मारणे बंद केले.” जेव्हा मुलाखत घेणाऱ्याने त्याला विचारले की आज त्याच्या मोठ्या यशानंतर त्याचे वडील त्याच्याबद्दल काय विचार करतात, तेव्हा यश हसून म्हणाला, “माझ्या वडिलांना चांगले वाटते, पण त्यांना अजूनही काही गोष्टी खटकतात. त्यांना वाटते की मी अजूनही लहान मुलासारखा आणि हट्टी आहे.”
आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढताना यशने आपल्या महत्त्वाकांक्षेचा आणि वडिलांच्या अतुलनीय योगदानाचा अभिमान व्यक्त केला. तो म्हणाला, “माझ्याकडे पैसे नसतानाही, माझ्यात एक वीरवृत्ती होती. माझे वडील बस ड्रायव्हर होते, दिवसाला १४ रुपये कमवायचे, पण त्यांनी मला कधीच कशाचीही कमतरता भासू दिली नाही. त्यांच्याकडे जे काही होते ते सर्व त्यांनी दिले.”
‘टॅाक्सिक’मधून येणार भेटीला
यशने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्याचा केजीएफ भाग पहिला आणि भाग दुसरा या चित्रपटाने त्याला यशच्या शिखरावर पोहचले. आता त्याचा बहुप्रतिक्षेत टॅाक्सिक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. २६ अॅागस्ट या दिवशी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
Varanasi airport: वाराणसी विमानतळावर गोळीबार ; भीषण हल्ल्यात दोघे गंभीर जखमी






