satara | सज्जनगड-परळी पायरी मार्गावर होणार शेकडो झाडांचे वृक्षारोपण

ठोसेघर, (प्रतिनिधी) – किल्ले सज्जनगड पायरी मार्गावर दि. ३० जून रोजी सकाळी सात ते बारा या वेळेत १११ वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. परळी सज्जनगड हा पुरातन पायरी मार्ग आहे. या मार्गावरून सज्जनगडावर जाण्यासाठी सुमारे एक हजार पायऱ्या आहेत.
या पायऱ्यावरून अनेक भाविक गडावर ये-जा करीत असतात. हा पायरी मार्ग जतन करण्यासाठी तसेच हा परिसर हिरवाईने बहरण्यासाठी विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती दुर्गनाद प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धकांनी दिली.
सकाळी साडेसात वाजता परळी बाजारपेठेतून ढोल ताशा पथक पारंपारिक वेशभूषेत वारकरी, शालेय विद्यार्थी तसेच परळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला वृक्षदिंडी सहभागी होणार आहेत.
या वृक्षारोपण मोहिमेमध्ये दुर्गनाद प्रतिष्ठान, सातारा तालुका वनविभाग ग्रामपंचायत परळी, काडसिद्धेश्वर आश्रम , श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी,
सज्जनगडावरील रामदास स्वामी संस्थान, समर्थ सेवा मंडळ ,अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच विविध सेवाभावी संस्था मंडळे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपण करण्यास सहभागी होण्याचे आवाहन किल्ले सज्जनगड संवर्धन समूहाच्या दुर्गसंवर्धकांनी केले आहे.





