Koynanagar News : हुंबरळी पाझर तलावाचे काम २५ वर्षांपासून रखडलेलेच
Koynanagar News : पाटण तालुक्यातील कोयना विभागातील हुंबरळी पाझर तलावाचे काम गेल्या २५ वर्षांपासून लालफितीत अडकले आहे.

Koynanagar News : पाटण तालुक्यातील कोयना विभागातील हुंबरळी पाझर तलावाचे काम गेल्या 25 वर्षांपासून रखडले असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पाठपुरावा आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या निर्देशांनंतरही प्रकल्पाला गती मिळालेली नाही. (Koynanagar News)
पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी सहकार्याची भूमिका घेतली असताना प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. वन्यजीव विभागाच्या परवानग्या आणि हरकतींमुळे प्रकल्प रखडल्याचे सांगण्यात येत आहे. (Koynanagar News)
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून या प्रकल्पाला 12 मे 2000 रोजी 6 कोटी 69 लाख 36 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. फेब्रुवारी 2001 मध्ये काम सुरू झाले. उपलब्ध जुन्या नोंदीनुसार एका टप्प्यावर सुमारे 4 कोटी 86 लाख रुपये खर्च झाला होता. (Koynanagar News)
2011 पर्यंत काम 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचा स्थानिकांचा दावा आहे. मात्र, त्यानंतर प्रकल्प रखडल्याने खर्च, उर्वरित काम आणि सुधारित अंदाजपत्रकाबाबत स्पष्टता आवश्यक आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर क्षेत्राच्या 2011 मधील सीमांकनाच्या पार्श्वभूमीवर तलावाचे काम थांबवण्यात आल्याचे सांगितले जाते. (Koynanagar News)
शंभूराज देसाई यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी 236 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी दोन ते तीन किलोमीटर परिसरातील शासकीय व निमशासकीय जमिनींचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंत्रालयातील बैठकीत जलसंपदामंत्री विखे- पाटील यांनी सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. सुधारित अंदाजपत्रक आठवडाभरात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. (Koynanagar News)
मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात काय कार्यवाही झाली, हे स्पष्ट झालेले नाही. 25 वर्षांचा विलंब, अपूर्ण काम आणि वाढती पाणीटंचाई यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. पालकमंत्र्यांचा पाठपुरावा आणि जलसंपदामंत्र्यांचे निर्देश प्रत्यक्ष निर्णयात रुपांतरित होणार की हुंबरळी पाझर तलाव आणखी कित्येक वर्षे कागदावरच राहणार, हा प्रश्न आता प्रशासनानेच सोडवायला हवा. जनतेला आश्वासनांची पुनरावृत्ती नको; प्रकल्प पूर्ण करण्याची ठोस कालमर्यादा आणि प्रत्यक्ष काम हवे! (Koynanagar News)

