Huma Qureshi : हुमा कुरेशी बॉयफ्रेंड रचित सिंगसोबत अडकणार लग्नबंधनात?
Huma Qureshi : २०२५ मध्ये अमेरिकेत रचित सिंहने हुमाला फिल्मी स्टाइलने प्रपोज केल्याच्याही चर्चा होत्या.

Huma Qureshi : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी वर्षी बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. या दोघांच्या नात्याची गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. त्यांनी गुपचुप साखरपुडा केल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.
एका रिपोर्टनुसार, २०२६ च्या शेवटी हुमा कुरेशी आणि रचित सिंह लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ते लग्नाचं प्लॅनिंग करत आहेत. त्यांच्या घरी लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. मात्र त्यांच्या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.
Salman Khan Post : सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीचे निधन; भावूक पोस्ट केली शेअर
हुमा कुरेशी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करणार असून सेलिब्रिटींसाठी ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहे. हुमाने अद्याप या लग्नाच्या बातम्यांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा लग्नाची तारीखही जाहीर केलेली नाही. (Huma Qureshi )
दरम्यान, ‘थामा’ चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते. सप्टेंबर २०२५ मध्ये अमेरिकेत रचित सिंहने हुमाला फिल्मी स्टाइलने प्रपोज केल्याच्याही चर्चा होत्या. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातही ते दोघे एकत्र होते. आता ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
रचित सिंग हा मुंबईतील एक प्रसिद्ध ॲक्टिंग कोच आणि ट्रेनर आहे. त्याने रणवीर सिंग, विकी कौशल आणि तापसी पन्नू सारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.
दरम्यान, हुमा कुरेशी ‘टॉक्झिक’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात ती साऊथचा सुपरस्टार यश सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तिचा मागील ‘सिंगल सलमा’ चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. (Huma Qureshi )
हेही वाचा:
Ratna Debnath: पनिहाटी मतदारसंघातही तृणमूलला मोठा झटका ; आरजीकर अत्याचार पीडितेची आई आघाडीवर






