Huma Qureshi : हुमा कुरेशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘महाराणी 5’ची अपडेट समोर
Huma Qureshi : अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर नाही

Huma Qureshi : लोकप्रिय वेबसीरिज ‘महाराणी’च्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम मिळाले. पहिल्या चार भागांच्या यशानंतर लवकरच ‘महाराणी’ सीझन पाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समोर आले आहे. ‘महाराणी’च्या पाचव्या सीझनबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
या सीरीजमध्ये हुमा कुरेशी राणी भारतीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सीरिजच्या आगामी भागाचं शूटिंग पूर्ण झालं असून, सध्या पोस्ट-प्रॉडक्शनवर काम सुरू आहे. लडाख, दिल्ली आणि भोपाळमधील विविध ठिकाणी याचे शूटिंग करण्यात आलं आहे.
माहितीनुसार, या लोकप्रिय सीरिजचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. वृत्तानुसार, ‘महाराणी ५’ जानेवारी २०२७ च्या सुरुवातीला ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.
‘महाराणी’ या सीरिजमध्ये बिहारमधील राजकीय वातावरण दाखवण्यात आलं आहे. हे पहिल्या तीन सीझनमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं आहे. आता हे चौथ्या सीझनमध्ये हे राजकारण दिल्ली दरबारी जातं आणि कशाप्रकारे हालचाली घडतात, ते दाखवण्यात आलं आहे. आता पाचव्या सीझनमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार? याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा:
Ram Temple: राम मंदिरातील नैवेद्य चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; सर्व याचिका निकाली





