आटाचक्की खरेदीला बारामतीत उदंड प्रतिसाद

बारामती- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील सुनील बनसोडे व सूर्यकांत पिसाळ यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत ५० टक्के सवलतीच्या दरात आटाचक्की चे वाटप केले जात आहे. नागरिकांचा देखील या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात साजरा होतो. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देखील विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण रक्तदान शिबीर तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात दिला जातो. याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका सोशल मीडियाच्या अध्यक्ष सुनील बनसोडे व सरचिटणीस सूर्यकांत पिसाळ यांनी
हा उपक्रम राबविला आहे. सर्वसामान्यांना ५० टक्के सवलतीच्या दरात आटा चक्की तसेच वॉटर प्युरिफायर, सोलर हिटर तसेच एक्वा ग्रँड दिला जात आहे. बारामती इंदापूर रस्त्यावरील पिंपळी येथील मॅकडॉल कंपनी चौकातील कॉम्प्लेक्समध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक महिन्यांच्या कालावधीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषराव ढवाणपाटील यांच्या मार्गदर्शन तसेच सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला आला असल्याचे सुनील बनसोडे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सवलतीच्या दरात आटा चक्की व वॉटर प्युरिफायर मिळत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद या योजनेला मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजू व्यक्तींना 50 टक्के सवलतीच्या दरात आटा चक्की तसेच इतर वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व संतोष ढवाण पाटील पाटील यांच्या मार्गदर्शन व सामाजिक जाणिवेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
– सुनील बनसोडे
सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. सवलतीच्या दरात वस्तू गरजू व्यक्तींना दिला जात आहेत. नागरिकांचा देखील या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे.
– सूर्यकांत पिसाळ





