मुंबई – ह्रितिक रोशन आपल्या जबरदस्त फिटनेससाठी नेहमीच ओळखला जातो. पिळदार शरीरयष्टी आणि जबरदस्त डान्स याच्या जोरावर ह्रितिकने चाहत्यांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं आहे. नुकतंच ह्रितिकने आपल्या सोशल मीडियावरून एक्सरसाइज करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ह्रितिक आपल्या ट्रेनरसह धावताना दिसतोय.
शर्टलेस होऊन एक्सरसाईज करतानाचे ह्रितिकचे हे फोटो तुफान व्हायरल होताहेत. ह्रितिक सध्या आपल्या आगामी ‘फायटर; या चित्रपटाच्या तयारीत आहे. यासाठी तो फिटनेसवर लक्ष देऊन बॉडी बनवत असल्याचे फोटोमध्ये दिसून येते. वाढलेले केस,कानात एरपॉड आणि डोक्यावर कॅप या अवतारात पळताना पाहून अनेकांच्या नजारा स्तब्ध झाल्यात. ह्रितिकची जबरदस्त बॉडी पाहून चाहत्यांनी पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
ह्रितिक यावेळी एका व्यक्तीला टॅग करत तू तयार आहेस का ? असं विचारलाय तसेच मी अजून तयार नसल्याचे म्हंटले आहे. त्यासोबतच ह्रितिकने यावेळी गॉट टू बॅक फायटर मोड’ असं कॅप्शन देखील दिल आहे. ह्रितिकची मैत्रीण सबा आजादने देखील या फोटोवर कमेंट केल्याचे पाहायला मिळते. सबा कमेंटमध्ये म्हणते,”हो तू तयार आहेस,तू जन्मतःच तयार आहेस, गो निंजा”.फायटर व्यतिरिक्त ह्रितिक विक्रम वेधा या चित्रपटात देखील दिसणार आहे.