Hrithik Roshan: सबा आझादच्या अभिनयावर हृतिक रोशन फिदा; म्हणाला- “तू जगातील सर्व आनंदाची हकदार आहेस”

Hrithik Roshan: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आपल्या प्रेयसी सबा आझादच्या नवीन चित्रपट ‘साँग्स ऑफ पॅराडाईज’ मधील भूमिकेचं मनापासून कौतुक केलं आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करताना हृतिकने सबाचे काही फोटो शेअर केले आणि तिला “अप्रतिम कलाकार” म्हणत भरभरून दाद दिली.
हृतिकने लिहिलं, “मी हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच पाहिला होता. त्यावेळी तो माझ्या मनाला भिडला. ‘झेबा’ या सबाने साकारलेल्या पात्रामुळे माझ्या डोळ्यांत अश्रू आले होते. आज या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघून माझा विश्वास अधिकच दृढ झाला आहे की मेहनतीला आणि कलेला नेहमी योग्य मान मिळतो.”
त्याने पुढे सांगितलं की, सबाने आपल्या करिअरमध्ये खूप संघर्ष सहन केला आहे. “मी तुझा संघर्ष, असहायता, निराशा आणि वेदना पाहिल्या आहेत. खऱ्या प्रतिभेला संधी मिळण्यापूर्वी फक्त फॉलोअर्स मोजले जातात, हीच या व्यवसायाची दुःखद बाब आहे. पण आज तुला तुझ्या कलेचं खरं फळ मिळताना बघून मला अपार आनंद होतो आहे. तू जगातील सर्व आनंदाची हकदार आहेस.”
आपल्या पोस्टच्या शेवटी हृतिकने लिहिलं, “ही परफॉर्मन्स माझ्या टॉप 10 परफॉर्मन्समध्ये आहे. रॉक ऑन बेबी! माझं हृदय अभिमानाने भरून आलं आहे. आय लव्ह यू.”
View this post on Instagram
‘साँग्स ऑफ पॅराडाईज’ बद्दल
एक्सेल एंटरटेनमेंट व ॲपल ट्री पिक्चर्स आणि रेंझू फिल्म्सच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. दानिश रेंझू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सोनी राजदान, जैन खान दुर्रानी, शीबा चढ्ढा, तारूक रैना, शिशिर शर्मा आणि लिलेट दुबे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट पद्मश्री पुरस्कार विजेत्या गायिका राज बेगम यांच्या आयुष्य व संगीत प्रवासावर आधारित आहे.





