हृतिककडून ’12 वी फेल’चे कौतुक; ‘या’ कारणामुळे अभिनेत्याला केले ट्रोल

Bollywood: अभिनेता विक्रांत मॅसीच्या (Vikrant Massey) 12 वी फेल या चित्रपटाचे देशभरातून कौतुक केले जात आहे. अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) देखील या चित्रपटाची स्तुती केली आहे. परंतु त्याची एक गोष्ट चाहत्यांच्या पसंतीस न पडल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
हृतिक रोशनने ट्वीट करत लिहिले की, “मी 12 वी फेल हा चित्रपट पाहिला. फिल्म मेकिंगमधला हा एक मास्टरक्लास आहे. इतर सर्व गोष्टींपेक्षा मला साऊंड आणि चित्रपटातील सीन अधिक रंजक करण्यासाठी वापरण्यात आलेले साऊंड इफेक्ट्स खूप आवडले. ब्रिलियन्ट परफॉर्मन्स… मिस्टर चोप्रा, काय चित्रपट आहे! मला यातून खूप प्रेरणा मिळाली आहे.”
Finally saw 12th Fail. It’s quite a masterclass in film making. Above everything else I was inspired by the use of sound and sound effects play in enhancing the moments. Brilliant performances. Mr. Chopra , what a movie ! Thank you for the brilliance. I am deeply inspired by this…
— Hrithik Roshan (@iHrithik) January 14, 2024
हृतिकने त्याच्या ट्वीटमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा उल्लेख केला आहे परंतु त्याने मुख्य भूमिकेतील अभिनेता विक्रांत मॅसीचा उल्लेख केलेला नाही. हृतिकच्या या चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘जर तुम्ही विक्रांतलाही क्रेडिट दिले असते तर आणखी मजा आली असती,’ असे लिहिले आहे.
सध्या त्याच्या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, हृतिक लवकरच ‘फायटर’चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले असून यात तो हवाई दलातील पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर हे कलाकार देखील असणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.





