War 2 Public Review : हृतिक अन् ज्युनिअर एनटीआरवर कौतुकाचा वर्षाव; वॅार 2 पाहिल्यानंतर प्रेक्षक काय म्हणाले?

War 2 Public Review : आज १४ अॅागस्ट २०२५ रोजी बहुचर्चित वॅार २ हा सिनेमा देशभरात रिलीज झाला आहे. या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा होती. अखेर वॅार २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात अभिनेता हृतिक आणि साऊथमधील अभिनेता ज्युनिअर एनटीआर यांचा स्क्रिन प्रेझेन्सर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. आता या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
प्रेक्षकांना ज्युनिअर एनटीआरचा परफॅारर्म्स भावला असून, हृतिक रोशनच्याही अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी वॅार २ हा सिनेमा १००० कोटी कल्बमध्ये सहभागी होणार असल्याचं भाकित केलं आहे. उद्या १५ अॅागस्ट असल्याने तसेच त्यानंतर शनिवार रविवार आहे, त्यामुळे वॅार २ मोठी कमाई करेल, असा अंदाज सिनेविश्लेषकांनी वर्तवला आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
वॉर २ हा सिनेमा पाहिलाच पाहिजे. खरं तर, हा सिनेमा अनेक वेळा पाहावा असा आहे. सिनेमात सर्वकाही आहे. अॅक्शन, ड्रामा, भावना, ट्विस्ट सरप्राईज. दुसऱ्या भागात येणारे ट्विस्ट जबरदस्त आहेत. हृतिक रोशनची स्क्रीन प्रेझेन्स, ऑरा आणि त्याच्या अभिनयाची बरोबरी कोणीही करू शकत नाही, असं एका युजरने लिहिलं आहे.
#War2Review
Its a must watch guys. Actually its a multiple watch movie 🔥
It has everything Action Drama Emotions Twists Surprise (Second half twists were too good)#HrithikRoshan screen presence and aura no one can match plus his range in acting . Man you seriously need to do… pic.twitter.com/KAFbwoip0x— Rohit 😇 (@goonerfromind) August 14, 2025
दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की सिनेमाचा क्लायमॅक्स सीक्वेन्स, हृतिक आणि ज्युनियर एनटीआर फाईट सीक्वेन्स, दोन्ही सुपरस्टार्सची ताकद पडद्यावर चांगल्या प्रकारे दाखवण्यात आली आहे.
हा एक नंबर वन चित्रपट आहे. ज्युनियर एनटीआर आणि हृतिकची एन्ट्री अप्रतिम आहे. चित्रपट उत्तम होता….. पठाण त्याच्यासमोर काहीच नाही…. 1000 कोटी नक्कीच कमावेल, अशा काही प्रतिक्रिया काही प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
Neutral audience is pouring love on #War2 ❤️ The real word of mouth has begun! 🔥#War2Review #HrithikRoshan #JrNTR #KiaraAdvani pic.twitter.com/Fqdo87TLjI
— Greek God (@trends_HRITHIK) August 14, 2025
वॅार २ हा सिनेमा २०१९ मध्ये आलेल्या वॅार सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमात हृतिक आणि ज्युनिअर एनटीआर यांची जोडी पाहायला मिळत आहे. वॅार २ सिनेमाला पहिल्याच दिवशी फर्स्ट डे शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा एक अॅक्शनपट सिनेमा असल्याने प्रेक्षक सिनेमाकडे आकर्षित झाले आहेत. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येचं चांगली कमाई केली आहे. या सिनेमात अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे.
हेही वाचा : “सर्व समस्या नियमांचे पालन न केल्यामुळे…” ; भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून जुना आदेश कायम





