Hritik Roshan And Saba Azad | अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांची नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा रंगलेली असते. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच हृतिकने सबाचा एक व्हिडीओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती गाताना दिसत आहे.
हृतिक रोशनने शेअर केलेल्या पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘किलिंग इट’. या व्हिडीओत सबा लाइव्ह शोदरम्यान गाताना आणि नाचताना दिसते आहे. हृतिक सबाचं नेहमीच कौतुक करताना दिसतो. मागील महिन्यात हृतिकने सबाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्टही शेअर केली होती.
दरम्यान, हृतिक आणि सबाची लव्हस्टोरी 2022 मध्ये सुरू झाली. हे जोडपे पहिल्यांदा ट्विटरवर कनेक्ट झाले जेव्हा अभिनेत्याने सबाचा व्हिडिओ लाइक केला आणि शेअर केला. सबाने थँक्स मेसेजला रिप्लाय दिला, ज्याने दोघांमध्ये संवाद सुरू झाला. फेब्रुवारी 2022 मध्ये डिनर डेट दरम्यान ते पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्याच वर्षी नंतर ते करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाला एकत्र दिसले. Hritik Roshan And Saba Azad |
हृतिकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर 2’ या ॲक्शन ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता कबीरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करणार आहे. आगामी ॲक्शन थ्रिलरमध्ये कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. Hritik Roshan And Saba Azad |
हेही वाचा:
Chitra Wagh : विरोधकांना इशारा देत देवेंद्र फडणवीसांसाठी चित्रा वाघ यांनी लिहिली ‘ही’ खास पोस्ट