War 2 Song : वॅार 2 मधील पहिलं गाण रिलीज; ‘आवां जावां’मध्ये हृतिक अन् कियाराचा रोमँटिक अंदाज, पाहा Video

War 2 Song : येत्या 14 अॅागस्ट या दिवशी वॅार 2 हा बहुचर्चित चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अशातच आता चित्रपटातील पहिलं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
‘आवां जावां’ हे वॅार 2 चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं असून या गाण्यात हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची रोमँटिक कमेस्ट्रींने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अरिजीत सिंग आणि निकिता गांधी यांच्या आवाजातील हे गाण प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. या गाण्यात अभिनेत्रीचा बिकिनी लूकही पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
‘आवां जावां’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर, गायक अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. वायआरएफ स्टुडिओचे सहकार्य असलेल्या संगीतकार प्रीतम यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्रामवर हे गाणं शेअर केलं आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत या गाण्याविषयी सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय कियारा अडवाणीचा आज वाढदिवस असल्याने तिला चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत आहेत. कियारा आता ३४ वर्षांची झाली आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर 2’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावा चित्रपट आहे, जो २०१९ च्या सुपरहिट चित्रपट ‘वॉर’चा सिक्वेल आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट आहे. कियारा अडवाणी आणि हृतिक रोशन व्यतिरिक्त या चित्रपटात दक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आहे. यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.





