हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

मुंबई – ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला “लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा रविवारी पार पडला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ मंगेशकर यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले.
यावेळी आदिनाथ मंगेशकर यांनी वडिल पं. हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.
आदिनाथ म्हणाले, माझे वडील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने ते येत्या 8-10 दिवसात घरी परततील. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणाही होत आहे, असेही त्यांनी सांगितले.





