वर्षभर सोने खरेदी टाळा! मोदींच्या आवाहनाचा सराफा बाजारपेठेवर कसा परिणाम?
Updated On:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन आणि सोने-चांदीवरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सराफा बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील सराफ व्यावसायिक शिवम तळेगावकर यांनी या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा केला असून बाजारातील व्यवहार मंदावल्याचे सांगितले. “देशहितासाठी निर्णय योग्य असेल, पण या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकांच्या रोजगाराचाही विचार व्हायला हवा,” असे मत त्यांनी व्यक्त केले. लग्नसराईच्या काळातही ग्राहकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.





