मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच मनसे आणि नुकत्याच शिवसेनेत पदार्पण केलेल्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणखीच वाढत असल्याचं असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काहीदिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी “आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो. याला थोडं बोलेन, त्याला थोडं बोलेन, काही वेळासाठी विचारवंत होईल, मध्येच मिमिक्री कलाकार होईल असा त्यांचा कार्यक्रम असतो.” अशी टीका त्यांनी केली होती. दरम्यान, त्यांच्या या टीकेनंतर मनसे कडून देखील सुषमा अंधारे यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मनसे नेते बाळानांदगावकर यांनी एका मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांच्या बाईपणावर टीका केली. ते म्हणाले, तुमची उंची किती… बोलता किती? बाईने बाईसारखं बोलावं… तुमचा प्रवास कुठून कुठपर्यंत झालाय, हे सर्वांना माहिती आहे… असा इशाराच त्यांनी दिला. मुंबईतील एका मेळाव्यात नांदगावकर बोलत होते. यावेळी नांदगावकर यांनी राज ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांचं खंडनही केलं.. “आपल्या साहेबांवर नेहमी आरोप करतात की साहेब भूमिका बदलतात. मात्र राज ठाकरे दिशा बदलवून इतिहास बदलतात. जे कधीही घडत नव्हतं ते राज ठाकरेंनी बदललं. किती दिवस आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, आता सत्तेतपण असलो पाहिजेत.’ असं देखील ते यावेळी म्हणाले.