Kiara Advani : कियाराने ‘टॅाक्सिक’साठी किती मानधन घेतलं? आकडा आला समोर
Kiara Advani : विशेषतः महिलांचे चित्रण ज्या पद्धतीने करण्यात आले आहे, त्यावर अनेकांनी आक्षेप घेत दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्यावरही टीका केली आहे.

Kiara Advani : अनेकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानंतर सुपरस्टार यशचा बहुचर्चित ‘टॉक्सिक‘ हा चित्रपट अखेर २६ ऑगस्ट या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या टीझरने उत्सुकता वाढवली असतानाच आता ‘तबाही’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात यश आणि कियारा अडवाणी यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री आणि काही इंटिमेट सीनमुळे नेटकऱ्यांनी चित्रपटाला तसेच निर्मात्यांवर टीकेची झोड उठली आहे. (Kiara Advani)
विशेषतः महिलांचे चित्रण ज्या पद्धतीने करण्यात आले आहे, त्यावर अनेकांनी आक्षेप घेत दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्यावरही टीका केली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (Kiara Advani)
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणीने या चित्रपटासाठी तब्बल १५ कोटी रुपये मानधन घेतले असून, तिच्या कारकिर्दीतील हे आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन मानले जात आहे. तिने घेतलेल्या इतक्या मोठ्या मानधनाची चर्चा सुरू झाली आहे. (Kiara Advani)

Kiara Advani : कियाराने ‘टॅाक्सिक’साठी किती मानधन घेतलं? आकडा आला समोर
या चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, रुक्मिणी वसंत, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया अशा पाच अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. यामध्ये कियारा ‘नादिया’ या पात्रातून यशच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. (Kiara Advani)
‘KGF 2’नंतर यशचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्याने ‘टॉक्सिक’कडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यास २०२६ हे वर्ष यशसाठी विशेष ठरू शकते. याच वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या रामायण या चित्रपटातही तो रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. Kiara Advani
हेही वाचा : Kareena Kapoor : करीनाचा नो मेकअप लुक! व्हेकेशनचा आनंद लुटतानाचे फोटो केले शेअर




