Kiara Advani : कियारा अडवाणीचा स्टायलिश अंदाज; सिंपल लुकमध्ये खुलले सौंदर्य
Kiara Advani : रेड कारपेटवर कियारा येताच तिने एका पेक्षा एक पोज देत सर्वांचे लक्ष वेधले

Kiara Advani : अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani )नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. आई झाल्यानंतर कियाराच्या चेहऱ्यावरील ग्लो अधिकच वाढला आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये तिने मुलगी सरायाहला जन्म दिला. त्यानंतर तिने मातृत्व आणि कुटुंबाला प्राधान्य देत अभिनयातून ब्रेक घेतला होता.
आता तिने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली असून, अलीकडेच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ज्यात तिचा क्लासी सुंदर लुक अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
कियाराने या इव्हेंटसाठी गडद ब्राऊन रंगाचा लेदर ड्रेस परिधान केला आहे. ज्यात तिचा लूक बोल्ड आणि मोहक दिसत आहे. Kiara Advani
रेड कारपेटवर कियारा येताच तिने एका पेक्षा एक पोज देत सर्वांचे लक्ष वेधले. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, कियारा अडवाणी अलीकडेच हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत ‘वॉर २’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. Kiara Advani
कियाराचा पुढील चित्रपट, ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मूळतः ४ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
या अॅक्शन ड्रामामध्ये यश मुख्य भूमिकेत दिसणार असून, यात नयनतारा, रुक्मिणी वसंत, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांच्याही भूमिका आहेत. Kiara Advani
हेही वाचा :






