Abhijit Bichukale : विधानसभा निवडणुकीमध्ये अभिजित बिचुकलेना किती मतं पडली?

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात मुख्य लढत होती. त्यानंतर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि एकच चर्चा रंगली.
पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतली. राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका लढवल्यानंतर अभिजीत बिचुकले बारामतीध्ये आपलं नशीब आजमावलं आहे.
अभिजीत बिचकुलेंना बारामतीकर पसंती देताना दिसत नाहीत. अभिजीत बिचकुले यांना सुरूवातीच्या कलामध्ये फक्त ९ मतं मिळली आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे.
या मतदारसंघामध्ये प्रमुख लढत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये झाली. या दोघांमध्ये तगडी फाईट झाली खरी पण आणखी एक उमेदवार चर्चेत राहिला तो म्हणजे अभिजीत बिचकुले. अभिजीत बिचकुले यांना आतापर्यंत 60 मते पडली आहेत.





