Team India : भारताचा मार्ग खडतर! सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसं आहे समीकरण? जाणून घ्या

Team India qualification scenario : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 13व्या सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. 49 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एलिस पेरीने षटकार मारुन ऑस्ट्रेलियाला 3 गडी राखून विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 330 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 7 चेंडूंआधी विजय नोंदवला.
भारतासाठी सेमीफायनलचे समीकरण –
सेमीफायनलच्या दृष्टीने भारतासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते, परंतु या पराभवामुळे भारतीय संघावर दडपण वाढले आहे. भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेत 4 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामन्यांत विजय आणि 2 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे 4 गुण आणि +0.672 च्या नेट रनरेटसह भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. भारताला आता इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध 3 सामने खेळायचे आहेत.
Australia win the match by 3 wickets.#TeamIndia fought spiritedly and will look to bounce back in the next match.
Scorecard ▶ https://t.co/VP5FlL2S6Y#WomenInBlue | #CWC25 | #INDvAUS pic.twitter.com/dc473c4dDW
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी भारताला हे तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. असे झाल्यास भारत 10 गुणांपर्यंत पोहोचू शकतो आणि नेट रनरेटही सुधारू शकतो. मात्र, जर भारताने 3 पैकी 2 सामने जिंकले आणि 1 गमावला, तर सेमीफायनलचा मार्ग खडतर होईल आणि भारताला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
हेही वाचा – IND W vs AUS W : एलिसा हीलीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! भारताचा सलग दुसरा पराभव
गुणतालिकेतील इतर संघांची स्थिती –
गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. त्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णित राहिल्याने 7 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे, इंग्लंडने 3 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. भारतासाठी आगामी सामने निर्णायक ठरणार असून, संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर उजवी कामगिरी करावी लागेल, तसेच नेट रनरेटवर विशेष लक्ष द्यावे लागेल.





