हाऊसफुल 5 चं अॅडव्हान्स बुकिंग सुसाट! इतकी तिकिटे झाली सेल,आकडे समोर

Housefull 5 ticket booking : अभिनेता अक्षय कुमार-अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख आणि इतर अनेक कलाकार बहुचर्चित ‘हाऊसफुल-५’ मध्ये किलर कॉमेडी करताना पाहायला मिळणार आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या किलर कॉमेडी चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या वेगाने सुरू असल्याचे समोर आले आहे.
हाऊसफुल ५ ची अॅडव्हान्स बुकिंगला रविवार, १ जूनपासून रोजी सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाची १ लाखाहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. ऑनलाइन तिकीट विक्रीतून सुमारे २.४५ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. आता गुरुवार ४ मेपर्यंतचे तिकिट बुकिंगचे आकडे आले समोर आले आहे.
Sakanlik.com च्या वृत्तानुसार, अक्षय कुमारच्या कॉमेडी फ्रँचायझीची १२,५९,०५२ तिकिटे आतापर्यंत विकली गेली आहेत. या चित्रपटाला आतापर्यंत भारतभर १४,२७७ शो मिळाले आहेत. हाऊसफुल ५ ने ऑनलाइन तिकीट विक्रीतून ३.९८ कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजून एक दिवस शिल्लक आहे आणि उद्या सकाळपर्यंत हाऊसफुल-५ अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सुमारे ५ कोटींची कमाई करेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात ५००० स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या ‘हाऊसफुल-५’ चित्रपटाला पहिल्या दिवशी २५ ते २७ कोटींची ओपनिंग मिळण्याचा अंदाज आहे.
‘हाऊसफुल ५’ मध्ये १७ स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय-रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन व्यतिरिक्त, सोनम बाजवा, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सौंदर्या शर्मा, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर हे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.





