Virat kohli – विराट कोहलीच्या हॉटेल रूमच्या व्हिडिओ लीक प्रकरणी हॉटेलच्या बाजूने प्रतिक्रिया समोर आली आहे. पर्थ येथील क्राउट टॉवर्स हॉटेलने सोमवारी माफीनामा जारी केला आहे. या माफीनाम्यात हॉटेलने बिनशर्त विराटची माफी मागितली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
हॉटेलने जारी केलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, “आम्ही या घटनेबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सुनिश्चित करतो. आम्ही संबंधितांना ताबडतोब काढून टाकले आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मूळ व्हिडिओ देखील काढून टाकला आहे.”
“एखाद्या मुलीच्या रूमचा व्हिडिओ जर…”,व्हिडिओ लीकप्रकरणी उर्वशी रौतेला भडकली
रूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विराटने ( Virat kohli ) त्यावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्याने घडलेल्या प्रकारावर आपण अत्यंत दुखी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सुरक्षा आणि गोपनीयतेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
View this post on Instagram
क्राउन टॉवर्स हॉटेलने तपासासाठी टीम तयार केली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी आवश्यक असल्यास कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. आम्ही टीम इंडियाचे खेळाडू आणि आयसीसीने हा माफीनामा स्वीकारावा, जेणेकरून आम्ही त्यांच्यासोबत काम करू.
व्हिडिओ लीक प्रकरणावर उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया
उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडिओ लीक होण्याच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने विराट कोहलीचा ( Virat kohli ) व्हिडिओ इन्स्टास्टोरीवर शेअर करून या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उर्वशीने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीच्या हेतूवर संशय देखील व्यक्त केला. तिने लिहिले की, “असाच महिलेच्या खोलीचा व्हिडिओ लीक झाला असता तर? अगदी! अनैतिक, अप्रामाणिक कल्पना करा की त्यांनी मुलीच्या खोलीत असेच केले तर.”असे उर्वशीने लिहिले आहे.