Wagholi News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाघोली आणि परिसरातील गावात ५ ठिकाणी आगीच्या घटना
Wagholi News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाघोली आणि परिसरात विविध ठिकाणी आग लागण्याच्या ५ घटना घडल्या. आगीची माहिती मिळताच वाघोली पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

Wagholi News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाघोली आणि परिसरात विविध ठिकाणी आग लागण्याच्या ५ घटना घडल्या. आगीची माहिती मिळताच वाघोली पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. (Wagholi News)
बकोरी फाटा वाघोली येथे गाडीला आग लागल्याची घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. कोलवडी गाव थेऊर लोणीकंद रोड येथे भंगाराच्या गोडाऊन आग लागल्याची घटना साडे आठच्या सुमारास घडली. बकोरी रोड बीजेएस कॉलेज येथे कचऱ्याला आग लागल्याची घटना सव्वा नऊच्या सुमारास घडली. (Wagholi News)
केसनंद गाव येथे चौथ्या मजल्यावरती फ्लॅटला आग लागल्याची घटना दहाच्या सुमार घडली. मांजरी येथे उसाला आग लागल्याची घटना सव्वा दहाच्या सुमारास घडली. (Wagholi News)



