Accident News: शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; भरधाव बसच्या धडकेत जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Accident News : जळगावहून शिरपूरकडे येणाऱ्या भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक

धुळे: जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत काही काळ वाहतूक रोखून धरली.
मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शिरपूर-चोपडा मार्गावर हा भीषण अपघात झाला. भाटपुरा (ता. शिरपूर) येथील चेतन योगेश गुजर (वय २३) आणि कल्पेश नितीन गुजर (वय २५) हे दुचाकीवरून घरी परतत असताना जळगावहून शिरपूरकडे येणाऱ्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, बसने दुचाकीसह दोघांना सुमारे १० ते १५ फूट फरपटत नेले. त्यामुळे दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकांची समजूत काढून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचा पुढील तपास थाळनेर पोलीस करत आहेत.
हेही वाचा:





