Khalapur accident : खालापूर फूडमॉलजवळ ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात
Khalapur accident : तांदूळ आणि अवजड कॉइल रस्त्यावर; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

खालापूर – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर फूडमॉलजवळ तांदळाचा ट्रक आणि अवजड कॉइल वाहून नेणाऱ्या ट्रेलरचा बुधवारी (दि. २६) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रकमधील तांदूळ तसेच ट्रेलरमधील अवजड कॉइल रस्त्यावर आल्याने पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
अपघातामुळे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
रस्त्यावर पडलेला तांदूळ हटविण्यासह अवजड कॉइल बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. कॉइलचा आकार आणि वजन मोठे असल्याने ती हटविण्यासाठी गॅस कटरच्या मदतीने कटिंग करण्यात आली.
रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असल्याने पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर रस्त्यावर पडलेले साहित्य हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
Pimpri News: जुलै महिन्यात वाहन खरेदी सुसाट! दुचाकी, कार आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ





