शिवाजीनगरमध्ये भीषण अपघात; पीएमपीएमएल बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणी ठार
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पीएमपीएल बस आणि दुचाकीत मंगळवारी झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट पुलावर घडली. दुचाकीस्वार तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.श्वेता शंकर दोडमणी (वय २३, रा. देहूरोड) असे मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव आहे. श्वेता तिच्या मित्रासह पुण्याच्या दिशेने येत असताना निगडी-पुणे मार्गावरील बस शेजारी आली.
यावेळी बसचा दुचाकीला धक्का बसल्याने दोघेही खाली कोसळले. यावेळी श्वेता ही बसच्या मागील चाकाखाली सापडून तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. श्वेता ही पदव्यूत्तर शिक्षण घेत होती. काही महिन्यांपासून आयटी कंपनीत कार्यरत होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.





