प्रभात वृत्तसेवा राहुरी : – बारागाव नांदूर परिसरात सकाळी दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात होऊन या घटनेत आदित्य बर्डे हा पंधरा वर्षाचा मुलगा मयत झाल्याची घटना समोर आली. तर दोनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शेखर किशोर माळी (वय १९, रा.राहुरी खुर्द, ता. राहुरी), हा तरुण सकाळी १०.३० वाजे दरम्यान त्याच्या मोटरसायकलवर राहुरीकडून बारागाव नांदूरकडे जात होता. त्त्याच्या मोटरसायकलवर आदित्य बर्डे हा मागे बसलेला होता. बारागाव नांदूर गावठाण, हावरी ओढा येथे शेखर माळी यांच्या मोटरसायकलची तसेच समोरून येणारा सोमनाथ नामदेव शिंदे याच्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी हजर राहून अपघातात जखमी झालेल्या तीनही मुलांना रुग्णालयात हलविले. यावेळी आदित्य शशिकांत बर्डे (वय १५, रा. बारागाव नांदूर) हा मुलगा रुग्णालयात उपचार सुरू असताना मयत झाला. तसेच शेखर किशोर माळी व सोमनाथ नामदेव शिंदे हे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी रुग्णवाहिका चालक बाळासाहेब वराळे यांनी मदतकार्य केले.