Gujarat Accident : गुजरातमध्ये भीषण अपघात.! बस आणि ट्रकची धडकेत 6 जणांचा मृत्यू, 2० गंभीर जखमी
या अपघातात सहा जण मरण पावले, तर सुमारे २० जण जखमी झाले. या बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी राजस्थानमधील होते, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

Gujarat Accident : गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात बुधवारी पहाटे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका खासगी बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस राजस्थानहून सुरतकडे जात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वडोदरा-हालोल महामार्गावरील कोटांबी गावाजवळ झाला. ट्रकचा चालक टायरमधील हवेचा दाब तपासत असताना ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला होता.
त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या बसने ट्रकला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
या अपघातात सहा जण मरण पावले, तर सुमारे २० जण जखमी झाले. या बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी राजस्थानमधील होते, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.





