होप फाउंडेशनची 320 कुटुंबांना मदत
Updated On:

केतकावळे – होप फाउंडेशन पुणे यांच्या यांच्यामार्फत मिसाळवाडी व चिव्हेवाडी येथील 320 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप सासवडच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, फाउंडेशनचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्राहक हक्क समितीचे अध्यक्ष महेश राऊत, घनश्याम सागडे, तलाठी पी. टी. राठोड, मंडलाधिकारी वांजळे, ग्रामसेवक गरड, सचिन कारकूड, अमोल पठारे आदी उपस्थित होते.





