शिरूर, ( वार्ताहर)- लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंचा शिरूर शहरामधील अवलिया नाना फलके यांनी सायकलवर तुतारी घेऊन जोरदार प्रचार केला. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाचर्णे यांच्यातर्फे नाना फलके यांना शिरुर शहरातील पक्षाच्या कार्यालयात नवीन तुतारी, मोबाइल, सायकल भेट देण्यात आली आहे. सायकलवर तुतारी घेऊन ते पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पंढरपूरवारीसाठी रवाना झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते आमदार अशोक पवार यांनी केलेल्या विकासकामाचा जोरदार प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाचर्णे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव गिरमकर, रामलिंग महिला पतसंस्थेच्या चेअरमन राणीताई कर्डिले, शहर महिला अध्यक्ष स्मिता कवाद, युवतीच्या अध्यक्षा गीताराणी आढाव, भाग्यश्री लेंगे, वसंतराव बेंद्रे, जमाल शेख, ज्योती लोखंडे, हाफिस बागवान, आदित्य उबाळे, सागर नरवडे, अक्षय सोनवणे, किरण बेल्हेकर, प्रदीप जाधव, संजय वाखारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.