मुंबई – प्रसिद्ध रॅपर हनी सिंग पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. जानेवारीमध्येच हनी सिंगने त्याची गर्लफ्रेंड टीना थडानीशी लोकांना ओळख करून दिली होती. पण आता हनी सिंग आणि टीनाच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत आहेत. टीना व्यवसायाने एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हनी सिंग आणि टीना जवळपास एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हनी सिंग आणि टीना थडानीच्या ब्रेकअपबद्दल बोलायचे तर, त्यांचे नाते तुटल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. एवढेच नाही तर दोघांनी सोशल मीडियावरील एकमेकांचे फोटोही डिलीट केले आहेत. आता या दोघांचे वेगळे होण्याचे कारण काय, हे सध्यातरी समोर आलेले नाही. अलीकडेच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत हनी सिंगने ब्रेकअपचे संकेत दिले होते. तो त्याच्या एका अल्बमबद्दल बोलत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘त्याच्या आगामी रोमँटिक अल्बमसाठी त्याला खूप बदल करावे लागले. कारण आधी त्याचे प्रेम होते पण नंतर ते प्रेम राहिले नाही. हनी आणि त्याची माजी पत्नी शालिनी तलवार यांचा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घटस्फोट झाला होता. 2011 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली, नंतर टीनाला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या. मात्र आता चाहते त्याचे ब्रेकअप झाले असल्याचे बोलत आहे.