ऊसतोड कामगारांच्या मुलांचा प्रामाणिकपणा; सापडलेले सोने केले परत

पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या दोन मुलांना बुधवारी रात्री साडेसात वाजता रस्त्यावर एक पर्स सापडली. त्याते सोन्याची 6 ग्रॅम चेन व 10 ग्रॅम सोन्याची रिंग अशी एकूण 16 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. मुलांच्या आई वडिलांनी लगेचच दागिन्यांची पर्स पारगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक लहू थाटे यांच्या ताब्यात दिल्याने त्या लहान मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक थाटे यांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपयांचे बक्षीस दिले.
महिला ज्योती भांड, पूनम कांबळे, या दोघींच्या आपल्या जवळील चैन व सोन्याची रिंग अशी दागिने असलेली पर्स सारिका गुंगळे यांच्याकडे ठेवली असता यांच्याकडून ती पर्स गहाळ झाली असल्याची लक्षात आले नाही रस्त्यावरून ऊसतोड कामगारांची मुले पप्पू दादाजी नवले (मालेगाव) व सुनिल मोतीराम माळी (आळेगाव) सटाणा हे दोघे चालले असता त्यांना रस्त्यात पर्स दिसली त्या दोघांनी पर्स खोलून पहिली असता त्यामध्ये 16 ग्रॅम सोन्याचे दागिने होते या दोघांनी पर्स आई- वडिलांकडे दिली.
आई वडिलांनी पर्स पारगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. दोन्हीही मुलांचे पारगाव ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक केले आणि जानकी कलेक्शनचे ज्योती भाड यांनी दोघांना शर्ट पीस बक्षिस दिले.





