Shreyas Talpade and Kajal Aggarwal meet Tukaram Mundhe: “‘प्रामाणिकपणा माझ्या DNA मध्येच आहे’; तुकाराम मुंढेंच्या एका वाक्याने काजल अग्रवाल भारावली”
Shreyas Talpade and Kajal Aggarwal meet Tukaram Mundhe काजलने पुढे लिहिले की, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी योग्य गोष्ट करण्याचा निर्धार कायम ठेवणारे तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी आहेत. सचोटी आणि प्रामाणिकपणा हा काही विशेष गुण नसून प्रत्येकाने तो आपल्या आयुष्याचा भाग बनवायला हवा, अशी भावना तिने व्यक्त केली.

Shreyas Talpade and Kajal Aggarwal meet Tukaram Mundhe: अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री काजल अग्रवाल यांचा आगामी ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दोघांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेतील मुंढेंचे एक वाक्य काजल अग्रवालच्या मनाला खूप भावले. त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या कामाचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, शेतीमध्ये कीटकनाशकांचा वाढता वापर आणि त्याचा नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम यावर भाष्य करण्यात आले आहे. समाजात जनजागृती व्हावी हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे.
याच विषयाशी संबंधित काम सध्या तुकाराम मुंढे करत आहेत. राज्यभरात अन्नभेसळ, अस्वच्छ हॉटेल्स आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात त्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी अशा प्रकारांची थेट तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या विषयाशी त्यांचे काम जवळून संबंधित असल्याने श्रेयस आणि काजल यांनी त्यांची भेट घेतली. (Shreyas Talpade and Kajal Aggarwal meet Tukaram Mundhe)
या भेटीनंतर काजल अग्रवालने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिली. तिने सांगितले की, तुकाराम मुंढे यांना भेटून तिला खूप आनंद झाला. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि निष्ठेबद्दल तिने त्यांचे कौतुक केले. मात्र, त्यावेळी मुंढेंनी दिलेले उत्तर तिच्या कायम लक्षात राहील, असे तिने म्हटले. (Shreyas Talpade and Kajal Aggarwal meet Tukaram Mundhe)
मुंढे म्हणाले, “प्रामाणिकपणा आणि निष्ठा या माझ्या कामाचा वेगळा भाग नाहीत. या गोष्टी माझ्या DNA मध्येच आहेत. जर लोकांना हे असामान्य वाटत असेल, तर याचा अर्थ आजच्या काळात प्रामाणिकपणा आणि सचोटी दुर्मिळ झाली आहे.” त्यांच्या या विचारांनी काजलला खूप प्रेरणा मिळाली. (Shreyas Talpade and Kajal Aggarwal meet Tukaram Mundhe)

Shreyas Talpade and Kajal Aggarwal meet Tukaram Mundhe: “‘प्रामाणिकपणा माझ्या DNA मध्येच आहे’; तुकाराम मुंढेंच्या एका वाक्याने काजल अग्रवाल भारावली”
काजलने पुढे लिहिले की, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी योग्य गोष्ट करण्याचा निर्धार कायम ठेवणारे तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी आहेत. सचोटी आणि प्रामाणिकपणा हा काही विशेष गुण नसून प्रत्येकाने तो आपल्या आयुष्याचा भाग बनवायला हवा, अशी भावना तिने व्यक्त केली.
तिने आपल्या पोस्टमध्ये ‘द इंडिया स्टोरी’ चित्रपटाचाही उल्लेख केला. या चित्रपटातूनही समाजाला हाच संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अन्नभेसळ, कीटकनाशकांचा अतिवापर आणि त्यामुळे होणारे आरोग्याचे धोके याबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. ग्राहक म्हणून आपल्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये, असेही तिने म्हटले. (Shreyas Talpade and Kajal Aggarwal meet Tukaram Mundhe)
पोस्टच्या शेवटी काजलने तुकाराम मुंढे यांना शुभेच्छा देत, भारताला त्यांच्यासारख्या प्रामाणिक आणि धाडसी अधिकाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले. श्रेयस तळपदेनेही काजलची ही पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली.
यापूर्वीही श्रेयस तळपदेने तुकाराम मुंढे यांच्या अन्नभेसळविरोधातील कारवाईचे कौतुक केले होते. तसेच स्वतःच्या आयुष्यात डेअरी पदार्थांचा वापर कमी केल्याचे आणि पालेभाज्या वापरण्यापूर्वी त्या नीट स्वच्छ धुवूनच खाव्यात, असे आवाहनही त्याने नागरिकांना केले होते.
‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने अन्नसुरक्षा, आरोग्य आणि प्रामाणिक प्रशासन या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून तुकाराम मुंढे यांच्या एका वाक्याने अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे.





