Makarand Patil: ना. मकरंदआबा वाढदिवस साजरा करणार नाहीत
Makarand Patil सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमधील शेतकरी संकटांचा सामना करत आहेत. या कठीण काळात त्यांना शक्य ती मदत करणे आणि गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. लोकनेते अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांचा लोकसेवेचा विचार आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Makarand Patil: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी अपघाती निधन आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी गुरुवार, दि. 29 रोजी असलेला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त सत्कार, हारतुरे यावर होणारा आणि इतर अनावश्यक खर्च टाळून गरजू शेतकरी आणि नागरिकांना मदत करावी. समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
ना. मकरंद पाटील यांनी म्हटले आहे की, दि. 29 ऑक्टोबर रोजी माझा वाढदिवस आहे. दरवर्षी आपण सर्व जण प्रेमाने आणि उत्साहाने माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी, भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहता. माझ्यावरील या निस्सीम प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल मी सदैव ऋणी आहे. मात्र, यावर्षी लोकनेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने माझे मन व्यथित आहे. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे मार्गदर्शन, जनतेबद्दलची तळमळ आणि सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करण्याची वृत्ती सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या असंख्य आठवणी मनात असताना वाढदिवसाचा जल्लोष करण्याची इच्छा नाही. त्याचबरोबर राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या वेदनांची जाणीव ठेवून, यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमधील शेतकरी संकटांचा सामना करत आहेत. या कठीण काळात त्यांना शक्य ती मदत करणे आणि गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. लोकनेते अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांचा लोकसेवेचा विचार आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी सत्कार, हारतुरे यावरील आणि इतर अनावश्यक खर्च टाळून गरजू नागरिक आणि शेतकरी बांधवांना शक्य तेवढी मदत करावी. समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा आनंद सत्कारात नसून, गरजू माणसाच्या चेहर्यावर उमटणार्या समाधानात आहे. आपले प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य यापुढेही कायम राहील, हा विश्वास आहे.





