Samarjit Ghatge : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून त्यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. आता पुन्हा ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हाती कमळ घेत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. या कार्यक्रमावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. समरजित घाटगेंची पहिली प्रतिक्रिया भाजपात प्रवेश केल्यानंतर समरजित घाटगेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमानिमित्ताने आमचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब, ज्यांना मला राजकारणात सक्रिय केले ते आमचे गुरू चंद्रकांतदादा पाटील साहेब, एका काळानंतर पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये यायची एक संधी मिळते.” या कार्यक्रमासाठी दादांनी पुढाकार घेऊन समन्वय साधून माझ्यासाठी चांगला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला. देवेंद्र फडणवीस माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. नगरपालिकेला माझी आणि मुश्रीफ साहेबांची युती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीने झाली होती, अशी पहिली प्रतिक्रिया समरजीत घाटगेंनी दिली आहे. कार्यकर्त्यांना मोलाचे आवाहन समजित घाटगे यांनी भाजपमध्ये जाताच पक्षातील कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी पक्ष जे सांगेल त्या निर्णायवर काम करायचं त्या प्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा उल्लेख करत मी जिल्हाध्यक्ष असताना राम लक्ष्मणाची जोडी म्हटले जायचे आत्ताही तसेच म्हटले जाणार. समरजित घाटगे भाजपमध्ये आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार आहेत. हेही वाचा : Mrunal Thakur: “रणवीर सिंहमुळेच मी इंडस्ट्रीत आले”… मृणाल ठाकूरचं मोठं वक्तव्य, अभिनेत्याचं भरभरून कौतुक