आठवलेंच्याच स्टाईलमध्ये अनिल देशमुखांकडून सदिच्छा; म्हणाले, ‘कोरोना गो…’
Updated On:

मुंबई – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृती ठीक आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ते मुंबईतील खासगी रूग्णालयात दाखल झाले आहेत. आठवलेंचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर ते लवकर कोरोनामुक्त व्हावेत यासाठी त्यांचे अनेक समर्थक तसेच इतर राजकीय नेते त्यांना सदिच्छा देत आहेत. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना खास त्यांच्याच स्टाईलमध्ये सदिच्छा दिल्या आहेत.
“‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा,
ग्रासले त्याच कविमित्र रामदासा ||
धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,
कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का ||
रामदास आठवले लवकर बरे व्हा.” असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.





