Rakhi Sawant: ‘घर स्मशानासारखं वाटतं’; राखी सावंत पॉडकास्टमध्ये भावूक, भारती सिंहच्याही डोळ्यांत आले अश्रू
Rakhi Sawant राखीने तिच्या अपयशी वैवाहिक आयुष्याबद्दलही खुलासा केला. ती म्हणाली की आता पुन्हा लग्न करण्याची हिंमत होत नाही. “लोकांना पत्नी नको असते, ते फक्त माझा वापर करून पुढे जायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवावासा वाटत नाही,” असे ती म्हणाली. तिच्या आवाजातील वेदना स्पष्ट जाणवत होती.

Rakhi Sawant: नेहमी हसतमुख आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी राखी सावंत नुकतीच एका पॉडकास्टमध्ये भावूक झालेली पाहायला मिळाली. कॉमेडियन भारती सिंह आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये राखीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वेदना मोकळेपणाने व्यक्त केल्या. या दरम्यान तिला रडू कोसळल आणि तिचं बोलणं ऐकून भारती सिंहलाही अश्रू अनावर झाले.
पॉडकास्टमध्ये बोलताना राखी म्हणाली, “मी खूप रडते. काल रात्रीही खूप रडले. मला विचारणारं कोणीच नाही की तू जेवलीस का नाही. आई जिवंत होती तेव्हा ती काळजी घ्यायची.” आईच्या आठवणीने राखी आणखी भावूक झाली. तिच्या आयुष्यातील एकटेपणाबद्दल बोलताना ती म्हणाली की, “घरही स्मशान घाटासारखं वाटतं, कारण तिथे विचारपूस करणारं कोणीच नाही.”
राखीने तिच्या अपयशी वैवाहिक आयुष्याबद्दलही खुलासा केला. ती म्हणाली की आता पुन्हा लग्न करण्याची हिंमत होत नाही. “लोकांना पत्नी नको असते, ते फक्त माझा वापर करून पुढे जायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवावासा वाटत नाही,” असे ती म्हणाली. तिच्या आवाजातील वेदना स्पष्ट जाणवत होती.
View this post on Instagram
राखी सावंतच्या आयुष्यात दोन विवाह झाले, पण दोन्ही नात्यांचा शेवट विभक्त होण्यात झाला. २०१९ मध्ये तिने रितेश सिंहसोबत लग्न केलं होतं. मात्र २०२२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याच वर्षी तिने उद्योगपती आदिलसोबत निकाह केला, पण हे नातेसुद्धा फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळे तिच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष अधिक वाढला.
पॉडकास्टमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी राखीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. “इतकं दुःख असूनही ती नेहमी लोकांना हसवत असते,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. काहींनी तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं, तर काहींनी तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा अशी शुभेच्छा दिल्या.
राखी सावंतला लोक नेहमी मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणून पाहतात. मात्र या पॉडकास्टमधून तिच्या आयुष्यातील एक वेगळी आणि भावूक बाजू समोर आली. तिच्या मनातील एकटेपणा आणि तुटलेला विश्वास यामुळे अनेक चाहतेही भावूक झाले आहेत.





