कॉंग्रेससाठी बेरंग ठरली होळी; भाजपची लवकरच दिवाळी?
Updated On:

भोपाळ : मध्यप्रदेश सरकार धोक्यात आल्याने कॉंग्रेससाठी होळी बेरंग ठरली. तर, त्या राज्याची सत्ता पुन्हा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमधून लवकरच दिवाळी साजरी होणार असल्याचा सूर उमटू लागला.
मध्यप्रदेशशी संबंधित राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषात होळी साजरी केली. त्यावेळी होळीमुळे आनंदित असल्याचे सांगतानाच त्यांनी लवकर दिवाळी येणार असल्याची सूचक प्रतिक्रिया दिली.





