Holi 2025 : कृष्णाच्या ‘मथुरा-वृंदावन’मध्ये होळीला सुरुवात; गर्दीमुळे भाविकांचे झाले हाल, पाहा धक्कादायक Video

mathura-vrindavan | Holi 2025 : होळीपूर्वीच उत्तर प्रदेशातील मथुरा येथे भाविकांची मोठी गर्दी असते. येथील बांके बिहारी मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. मंदिरात इतकी गर्दी आहे की पाय ठेवायलाही जागा नाही. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसत आहे.
मथुरा-वृंदावनमध्ये होळीच्या काही दिवस आधी रंग खेळायला सुरुवात होते. बांकेबिहारी मंदिरातही होळी मोठ्या उत्साहात खेळली जात आहे. यामुळेच येथे भाविकांचा सतत ओघ सुरू असतो.
भारतातील सर्व राज्यांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण होळी साजरी करण्यासाठी देशाच्या आणि जगाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने लोक मथुरा-वृंदावनला पोहोचतात. होळीच्या दिवशी इथे इतकी गर्दी असते की पाय ठेवायलाही जागा नसते.
#WATCH मथुरा, उत्तर प्रदेश: भारी संख्या में श्रद्धालु बांके बिहारी मंदिर में दर्शन के लिए पहुंच रहे हैं। pic.twitter.com/0suy96TRhB
— ANI_HindiNews (@AHindinews) March 10, 2025
ब्रजमध्ये होळी वसंत पंचमीपासून सुरू होते. मथुरा-वृंदावनची होळी ४० दिवस चालते. जर तुम्हाला मथुरा-वृंदावनमध्ये रंगांचा उत्सव पाहायचा असेल, तर होळीच्या दिवशी जाण्याऐवजी, ब्रज होळी उत्सवाच्या सुरुवातीला मथुरा-वृंदावनला भेट देण्याचा विचार करू शकता.
खरं तर, उत्सवाच्या सुरुवातीला तुम्हाला होळीच्या दिवसापेक्षा खूपच कमी गर्दी दिसेल. होळीच्या सणाभोवती गर्दी असल्याने लहान मुलांसह मथुरा-वृंदावनला जाणे टाळावे.
इतक्या गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांसोबत जाण्याने तुम्हाला आणि तुमच्या मुलासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. वृद्धांसोबत होळी साजरी करण्यासाठी मथुरा-वृंदावनला जाणे टाळण्याचा सल्ला देखील दिला जातो. गर्दीमुळे वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
सध्या या भागातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत असून, यामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असल्याचं दिसत आहे. चेंगराचेंगरी, हाणामारी यासारख्या अनेक घटना याठिकाणी होत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून दिसून येते.





