Rais Shaikh : स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्च पूर्वी घ्या; सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Updated On:

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यात मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्च 2025 पूर्वी घ्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.
या मागणीबाबत रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिका 7 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवटीत आहेत.
देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय प्रदीर्घ काळ चालणे, हे भारतीय लोकशाहीसाठी मारक असल्याचे शेख म्हणाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्च 2025 पूर्वी घ्या, अशी लोकप्रतिनिधी या नात्याने माझी मागणी आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.





