हॉकीपटू मनदीपसिंगला करोना
Updated On:

नवी दिल्ली – भारतीय हॉकी संघाचा अव्वल खेळाडू मनदीपसिंगची नुकतीच करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती हॉकी इंडियाने दिली आहे.
भारतीय हॉकीपटू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) बंगळुरू येथील केंद्रात सराव करत आहेत, मनदीपसिंग बाधित ठरल्याने आता त्याच्यासह अन्य सहा खेळाडूंचेही विलगीकरण करण्यात आले आहे.
संघाचा कर्णधार मनप्रितसिंग, सुरेंद्र कुमार, जसकरण सिंग, वरुण कुमार व गोलकिपर क्रिशन बहादूर पाठक हेदेखील बाधित ठरले आहेत. या सर्व खेळाडूंवर केंद्रातील डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. या सर्व खेळाडूंमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. तरीही, खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.





