Five-Nations Tournament 2023 : स्पेन दौऱ्यासाठी महिला हॉकी संघाची घोषणा….

नवी दिल्ली :– भारताने शुक्रवारी स्पेनमध्ये होणाऱ्या पाच देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी गोलकीपर सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील २२ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली, ज्यामध्ये अनुभवी फॉरवर्ड वंदना कटारियाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
१५ ते २२ डिसेंबर दरम्यान व्हॅलेन्सिया येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा सामना आयर्लंड, जर्मनी, स्पेन आणि बेल्जियम यांच्याशी होणार आहे. रांची येथे १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे.
IPL 2024 : पंजाब किंग्जने संजय बांगरकडे सोपवली मोठी जबाबदारी; दिसणार एका खास भूमिकेत…
संघ : गोलरक्षक : सविता (कर्णधार), बिचू देवी खरीबम; बचावपटू : निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, गुरजीत कौर, अक्षता आबासो ढेकळे; मिडफिल्डर: निशा, वैष्णवी विठ्ठल फाळके, मोनिका, सलीमा टेटे, नेहा, नवनीत कौर, सोनिका, ज्योती, बलजीत कौर; फॉरवर्ड: ज्योती छेत्री, संगीता कुमारी, दीपिका, वंदना कटारिया (उपकर्णधार), सौंदर्य डुंगडुंग, शर्मिला देवी.





