Sanjay Bangar Punjab Kings IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या आधी संजय बांगर पंजाब किंग्जमध्ये सामील झाले आहेत. पंजाब किंग्जने संजय बांगर यांची क्रिकेट विकास विभागाच्या प्रमुखपदी (Head of Cricket Development) नियुक्ती केली आहे.
बांगरने यापूर्वी अनेक संघांसाठी कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पंजाबने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. सर्व संघ या लिलावाच्या तयारीत व्यस्त आहेत.
पंजाब किंग्स ने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी बांगरच्या फोटोसोबत लिहिले की, ‘आम्हाला कळवताना आनंद होत आहे की, आमचा सिंह संजय बांगर परतला आहे. त्याला पंजाब किंग्जचे क्रिकेट विकास प्रमुख बनवण्यात आले आहे. बांगर यांच्याकडे खूप अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा संघ नवीन उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे.
We are delighted to announce the return of our sher, Sanjay Bangar as the new Head of Cricket Development at Punjab Kings.
Mr. Bangar brings a wealth of experience and expertise to our organization, and we are confident that under his leadership, our cricket development… pic.twitter.com/oDamatwpYg
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) December 8, 2023
संजय बांगर याआधीही पंजाबशी संबंधित आहेत. जानेवारी 2014 मध्ये ते किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहाय्यक प्रशिक्षक झाले. मात्र, त्यानंतर संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स करण्यात आले. त्यांनी इतर आयपीएल संघांसाठी काम केलं आहे. त्यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिकाही पार पाडली आहे. संजय यांनी कोलकाता नाईट रायडर्स आणि कोची टस्कर्स संघासोबतही काम केले आहे. बांगर यांनी भारत अ आणि टीम इंडियासाठी कोचिंग स्टाफमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.