Hockey India : टीम इंडियाची स्टार खेळाडू AIR INDIA वर संतापली! जाणून ‘घ्या’ कारण…

Rani Rampal slams Air India :- भारतीय हॉकी स्टार आणि पद्मश्री पुरस्कार विजेती राणी रामपाल सध्या चर्चेत आहे. त्यामागचे कारण म्हणजे तिचे एक ट्विट, ज्यात तिने एअर इंडियाला टॅग करून आपली नाराजी व्यक्त केली. कॅनडातून भारतात परतत असताना, राणीने एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये तिच्या सामानासोबत आलेली समस्या शेअर केली, ज्यामुळे इंटरनेटवर बरीच चर्चा झाली.
एअर इंडियाच्या विमानात भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालची ट्रॉली बॅग फुटली. 29 वर्षीय हॉकीपटू कॅनडाहून मायदेशी परतत होती. यावर राणीने आपला राग सोशल मीडिया एक्स पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे, मात्र एअर इंडियाने तत्काळ राणी रामपालची माफी मागितली आहे.
राणी रामपाल टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती भारतीय संघाचा भाग होती. तिला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. राणीने सोशल पोस्टमध्ये लिहिले- ‘या सरप्राईजबद्दल एअर इंडियाचे आभार. तुमच्या कर्मचाऱ्यांचे बॅगसोबतचे हे वर्तन आहे. आज दुपारी कॅनडाहून दिल्लीला पोहोचलो तेव्हा मला माझी बॅग तुटलेली दिसली.’
Thank you Air India for this wonderful surprise. This is how your staff treat our bags. On my way back from Canada to India this afternoon after landing in Delhi I found my bag broken.@airindia pic.twitter.com/xoBHBs0xBG
— Rani Rampal (@imranirampal) October 5, 2024
एअर इंडियाने राणी रामपालची माफी मागितली, तिच्या प्रवासाचा तपशील विचारला आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे. एअर इंडियाने लिहिले आहे की, ‘प्रिय मिस राणी रामपाल, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया आम्हाला तुमचा तिकीट क्रमांक, बॅग टॅग क्रमांक आणि नुकसान तक्रार क्रमांकाची प्रत पाठवा. आम्ही या प्रकरणात लक्ष घालू.’
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…
दरम्यान, एअर इंडियाच्या प्रतिसादावर बरेच लोक समाधानी नव्हते. राणी रामपालचे फाॅलोअर्स आणि इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एअरलाइनच्या सेवेवर चांगलीच टीका केली. एकानं ट्विट केलं आहे की, “एअर इंडियाने त्यांच्या सेवा सुधारल्या पाहिजेत. ते फक्त माफी मागत राहतात पण प्रत्यक्षात काहीच सुधारणा करत नाहीत.”




