WBBL 2025 : १० वर्षांनंतर होबार्ट हरिकेन्सने पटकावले पहिले जेतेपद! RCB प्रमाणे केला ‘डबल’ धमाका

Hobart Hurricanes won maiden WBBL title 2025 : २०२५ हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवणारे ठरले आहे. याच वर्षी जूनमध्ये आरसीबी संघाने १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे, आता १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विमेन्स बिग बॅश लीग २०२५ मध्ये होबार्ट हरिकेन्सला यश मिळाले आहे. शनिवारी १३ डिसेंबर रोजी झालेल्या ११ व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात होबार्टने पर्थ स्कॉर्चर्सचा ८ गडी राखून पराभव करत आपले पहिले-वहिले डब्ल्यूबीबीएल जेतेपद जिंकले.
एकतर्फी सामन्यात होबार्टने मारली बाजी –
होबार्ट येथे झालेल्या या अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी केली, परंतु होबार्टच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बेथ मूनी (३३) आणि कर्णधार सोफी डिव्हाईन (३४) यांच्या खेळीच्या बळावर पर्थने कशीबशी १३७ धावांपर्यंत मजल मारली. होबार्टसाठी लिन्सी स्मिथ आणि हेदर ग्रॅहम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Hobart Hurricanes win their maiden WBBL title.
2025 is truly an year of miracles. #HobartHurricanes #WBBL2025 pic.twitter.com/GnUjB1yyKQ
— CricTracker (@Cricketracker) December 13, 2025
होबार्टसाठी १३८ धावांचे लक्ष्य अजिबात कठीण ठरले नाही, याचे श्रेय अनुभवी सलामीवीर लिजेल ली हिला जाते. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी स्टार फलंदाजाने केवळ ४४ चेंडूंमध्ये ७६ धावांची नाबाद आणि स्फोटक खेळी करत संघाला केवळ १५ षटकांत विजय मिळवून दिला. लिजेलने या हंगामातील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण करताना १० चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारले. नॅट सिवर-ब्रंटनेही ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. होबार्ट हरिकेन्सने फक्त २ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले.
होबार्टची कहानी आरसीबीशी जुळती –
Hobart Hurricanes are champions! 💜🏆
A commanding eight-wicket win secures the #WBBL double, powered by a superb attack and Lizelle Lee’s explosive finish.#HobartHurricanes pic.twitter.com/APHO9FCcs3
— Star Sports (@StarSportsIndia) December 13, 2025
या विजयामुळे होबार्ट हरिकेन्सने डब्ल्यूबीबीएलच्या ११ हंगामांच्या इतिहासात प्रथमच ट्रॉफी उंचावली. महत्त्वाचे म्हणजे, होबार्टने याच वर्षी बिग बॅश लीग (BBL) आणि डब्ल्यूबीबीएल (WBBL) या दोन्ही स्पर्धांमध्ये जेतेपद जिंकण्याचा ‘डबल’ धमाका केला आहे. गेल्या हंगामात होबार्ट हरिकेन्सच्या पुरुष संघानेही पहिले बीबीएल जेतेपद जिंकले होते. योगायोगाने, हेच यश आरसीबी जुळते. आरसीबीने २०२४ मध्ये पहिली विमेन्स प्रीमियर लीग (WPL) जिंकली, तर याच वर्षी त्यांच्या पुरुष संघाने आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला होता.





