Rohit Sharma : हिटमॅन नव्या भूमिकेत! टेलिव्हिजनवर दमदार एन्ट्री, नव्या शोचा टीझर आला समोर
Rohit Sharma : नुकताच या शोचा प्रोमो मंगळवारी रिलीज करण्यात आला. या प्रोमोमध्ये रोहित शर्मा एका कॅफेसदृश ठिकाणी बसलेला दिसतो.

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर एका नव्या भूमिकेत बघायला मिळणार आहे.‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या नव्या रिॲलिटी शोची घोषणा करण्यात आली असून, या शोचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचे सूत्रसंचालन स्वतः रोहित शर्मा करणार आहे. (Rohit Sharma )
नुकताच या शोचा प्रोमो मंगळवारी रिलीज करण्यात आला. या प्रोमोमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma)एका कॅफेसदृश ठिकाणी बसलेला दिसतो. यावेळी काही नवीन व्यक्ती आणि खेळाडू त्याच्याशी संवाद साधताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, रोहितजवळ येणारे अनेक जण त्याला त्याचा प्रसिद्ध ‘गार्डन’ डायलॉग बोलण्याची विनंती करताना दिसतात. ( Rohit Sharma)
रोहितचा हा डायलॉग क्रिकेट चाहत्यांच्या चांगलाच परिचयाचा आहे. एका सामन्यादरम्यान रोहितने आपल्या सहकाऱ्यांना “बागेत कोणीही फिरणार नाही”असे म्हटले होते. स्टंप माइकवर रेकॉर्ड झालेला हा संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता याच गाजलेल्या डायलॉगची झलक रोहितच्या नव्या शोच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
Family Full House With Rohit Sharma!📷
Starting from 19th September, only on Sony LIV and Sony Entertainment Television.#RohitSharma #ComingSoon #SonyLIV pic.twitter.com/eDaK51JZKh
— Sony LIV (@SonyLIV) September 1, 2026
प्रोमोमध्ये रोहित शर्मा आपल्या खास अंदाजात म्हणतो, “मी फक्त दोन ओळी बोललो, ज्या इतक्या व्हायरल झाल्या. जेव्हा पूर्ण शो प्रदर्शित होईल, तेव्हा काय होईल हे कोणास ठाऊक.” रोहितच्या या वक्तव्यामुळे शोमध्ये त्याचा विनोदी आणि मनोरंजक अंदाज पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होते. ( Rohit Sharma)
मात्र, या शोचा नेमका फॉरमॅट काय असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा शो ‘बिग बॉस’ किंवा ‘खतरों के खिलाडी’सारखा असेल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, हा शो पूर्णपणे वेगळ्या संकल्पनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. ( Rohit Sharma)
१९ सप्टेंबरपासून सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर हा शो प्रदर्शित होणार आहे. या शोची माहिती देताना सोनी नेटवर्कने अनस्क्रिप्टेड रिॲलिटी शो आणि कौटुंबिक मनोरंजन असे म्हटले आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शोच्या फॉरमॅटबाबत बोलायचे झाल्यास ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’हा शो अमेरिकन गेम शो ‘फॅमिली फ्युड’च्या धरतीवर तयार करण्यात आला आहे. ( Rohit Sharma)
या फॉरमॅटमध्ये दोन कुटुंबे विविध मजेदार खेळ आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एकमेकांविरुद्ध स्पर्धा करतात, अशी साधारणपणे कंन्स्पेट शोची आहे. आता क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक आणि मजेशीर शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा रोहित शर्मा या गेम शोचे सूत्रसंचालन कशा पद्धतीने करतो, तसेच भारतीय प्रेक्षकांसाठी हा फॉरमॅट किती मनोरंजक ठरतो, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. ( Rohit Sharma)





