अनिल परब यांना दणका ! रत्नागिरीतील भूखंडाची एनए परवानगी रद्द
Updated On:

मुंबई – राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील भूखंडाला देण्यात आलेली एनएची परवानगी त्या जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी रद्दबातल ठरवली आहे.
या भूखंडाच्या जागेवर अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारणी केली आहे. यासाठी या भूखंडाला 2017 साली ना कृषक (एनए) असा दाखल देण्यात आला होता. अनिल परब हे राज्याचे परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री आहेत. त्यांचा एनएचा दाखला रद्द करण्याचा आदेश 6 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या आदेशाची प्रत ट्विटरवर प्रसारीत केली आहे. परब यांनी राजकीय दबाव आणून हा दाखला मिळवला होता, असा सोमय्या यांचा आरोप होता. हा भूखंड रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात मुरूड येथे आहे.

