प्रसिद्ध गायक ‘दलेर मेहंदी’ यांनी रचला इतिहास; मेटाव्हर्सवर बनले पहिले भारतीय परफॉर्मर

नवी दिल्ली – ‘बोलो ता रा रा…, तुनक तुनक तुन.., हो जायेगी बल्ले बल्ले..’ या सारख्या पार्टी सॉंगने संपूर्ण देशाला आपल्या तालावर नाचायला भाग पडणाऱ्या प्रसिद्ध पंजाबी गायक ‘दिलेर मेहंदी’ यांनी एक इतिहास रचला आहे. मेटाव्हर्स कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणारे दिलेर मेहंदी पहिले भारतीय गायक ठरले आहेत.
मेटाव्हर्सवर अनेक गायक आपले इव्हेंट आयोजित करत आहेत. एका भारतीय गायकाने पहिल्यांदाच मेटाव्हर्सवर आपला कार्यक्रम सादर केला. पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण जगात या कार्यक्रमाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यापूर्वी जस्टिन बीबर आणि ट्रेव्हिस स्कॉट सारख्या आंतरराष्ट्रीय गायकांनी मेटाव्हर्सवर कार्यक्रम सादर केले आहेत. मात्र, मेटाव्हर्सवर आपला सिंगगिंग शो करणारे दिलेर मेहंदी पहिले भारतीय गायक आहेत.
View this post on Instagram
दलेर मेहंदीने भारताचा पहिला मेटाव्हर्स कॉन्सर्ट देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनीच्या निमित्ताने आयोजित केला होता. या कार्यक्रमाची घोषणा त्यांनी 17 जानेवारी रोजी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन केली होती. पार्टी नाईट्स परफॉर्म करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.





