R Madhavan Hisab barabr Trailer | बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता आर माधवन ‘हिसाब बराबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अश्विनी धीर दिग्दर्शित ‘हिसाब बराबर’ हे केवळ सामाजिक नाटक नाही. त्यात कॉमेडी आहे आणि सध्याच्या सरकारी व्यवस्थेवर प्रकाश टाकला आहे. या सिनेमात आर माधवन भष्ट्राचाराच्या विरोधात लढताना दिसणार आहे. ‘हिसाब बराबर’ हा सिनेमा एक सोशल ड्रामा आहे. या सिनेमात आर माधवन रेल्वे टीसीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात आर माधवन साकारत असलेल्या भूमिकेचं नाव राधे मोहन असं आहे. R Madhavan Hisab barabr Trailer | तर अभिनेता नील नितीन मुकेश सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत आहेएक सामान्य आयुष्य जगणारा मध्यमवर्गीय कुटुंबातील भष्ट्राचारविरोधात लढणारी व्यक्ती अशी त्याची भूमिका आहे. कॉर्पोरेट बँकांमधील घोटाळा तो उघड करणार आहे. R Madhavan Hisab barabr Trailer | ‘हिसाब बराबर’या सिनेमात तो मिकी मेहता या एका पावरफूल बँकरची भूमिका साकारताना दिसणार आहे. राधे मोहनची ही कथा केवळ भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची नाही. तर वैयक्तिक आयुष्यातही त्याला आव्हानांचा सामना करावा लागत आहे, हे दाखवण्यात आले आहे. Jio Studios आणि SP Cinecorp च्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर 26 नोव्हेंबर 2024 रोजी 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. त्यावेळी याला भरपूर दादही मिळाली. यानंतर आता ‘हिसाबा बराबर’ OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर २४ जानेवारीला रिलीज होणार आहे. ट्विटरवर याची घोषणा करताना ओटीटी प्लॅटफॉर्मने लिहिले की, ‘जेव्हा सामान्य माणूस उभा राहतो, तेव्हा यंत्रणा हादरते. फसवणूक करणाऱ्यांनी सावधान! आता आर. माधवन स्कोअर सेटल करेल! 24 जानेवारीला प्रीमियर, फक्त ZEE5 वर पहा”. R Madhavan Hisab barabr Trailer | आर माधवन आणि कीर्ती कुल्हारी व्यतिरिक्त ‘हिसाब बराबर’मध्ये अनिल पांडे, महेंद्र राजपूर, फैजल रशीद, बोंदिप शर्मा आणि रश्मी देसाई यांच्याही भूमिका आहेत.तर ज्योती देशपांडे, शरद पटेल आणि श्रेयांशी पटेल यांनी निर्मिती केली आहे. हेही वाचा: Rahul Dravid Birthday : हॅप्पी बर्थडे द्रविड…! १९९६ पासून करिअरला सुरूवात; खेळाडू ते प्रशिक्षक, असा राहिलाय क्रिकेटर राहुल द्रविडचा प्रवास