टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि जागतिक क्रिकेटमध्ये आपले अमूल्य असे योगदान देणारे राहुल द्रविड यांचा आज ५२ वा वाढदिवस आहे. द्रविड यांचा खेळाडू ते प्रशिक्षक हा प्रवास अद्भूत होता. त्यांनी १९९६ मध्ये आपल्या क्रिकेटच्या करिअरची सुरूवात केली. टीम इंडियामध्ये द्रविड यांच्या खेळाची कामगिरी उत्तम राहिलेली आहे. शांत आणि संयमी खेळाडू अशी त्यांची ख्याती राहिलेली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक पदाची दुवा हाती घेतली आहे.
राहुल द्रविड यांनी 1996 मध्ये एप्रिलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांना जून महिन्यात द्रविडला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 164 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 286 डावांमध्ये फलंदाजी केली आणि 52.31 च्या सरासरीने 13288 धावा केल्या होत्या. द्रविडच्या नावावर कसोटीत 36 शतके आणि 63 अर्धशतके आहेत. कसोटीत 5 द्विशतके झळकावण्यातही ते यशस्वी झाले.
सर्वाधिक कॅच घेणारा खेळाडू
ODI अंतर्गत, द्रविडने 344 सामने खेळले आहेत. 318 डावात फलंदाजी केली आहे आणि 39.17 च्या सरासरीने 10889 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 शतके आणि 83 अर्धशतके आहेत. ज्यामध्ये 31 धावा त्यांनी केल्या आहेत. द्रविडच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. त्यांनी 10 वेगवेगळ्या देशांमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात शतके केली आहेत. सचिन तेंडुलकरनंतर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा करणारा द्रविड हे भारतातील दुसरा खेळाडू आहे. तसेच क्रिकेट खेळात गाऊंडवर सर्वाधिक कॅच घेण्याचा मोठा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आतापर्यंत त्यांनी 210 कॅच घेतले आहेत.
द्रविड आणि विश्वचषक
द्रविडच्या नेतृत्वाखाली 2006 मध्ये भारताने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवला होता. 2018 मध्ये ते अंडर-19 भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले होते. या संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला. यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असताना त्यांनी युवा खेळाडूंना तयार केले. 2021 मध्ये ते टीम इंडियाचे प्रशिक्षक झाले. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने 2024 टी20 विश्वचषक जिंकला होता.