Hinjewadi Metro: हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनचे नियोजन
Hinjewadi Metro:

Hinjewadi Metro: पीएमआरडीएच्या पुढाकाराने सुरू असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गे माणिकबाग क्रमांक तीनचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नोव्हेंबर रोजी ऑनलाइन (व्हर्च्युअल) पद्धतीने उद्घाटन करण्याचे नियोजन सुरू आहे. हा सोहळा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेट्रोच्या उद्घाटनासाठी यापूर्वी काही तारखा चर्चेत आल्या होत्या. विधानसभा निवडणुका आणि विविध कार्यक्रमांमुळे कार्यक्रम लांबणीवर पडला होता. आता ३ नोव्हेंबरला कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.



